आघाडीतील घटक असलेल्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
बारामती (जिल्हा पुणे) – महाविकास आघाडीमध्ये कुणाला मंत्री करायचे याचा अधिकार पक्षप्रमुखांना आहे आणि ते त्याविषयी निर्णय घेत असतात. आघाडीतील घटक असलेल्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, अशा प्रकारे संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. अनील देशमुख यांना अपघाताने गृहमंत्रीपद दिल्याचे विधान संजय राऊत यांनी केल्यानंतर २८ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशी चेतावणीसुद्धा दिली.
अजित पवारांनी जोरदार टोला लगावत, संजय राऊत यांना चांगलेच बजावले https://t.co/TJzY8O2I1Z
— News18Lokmat (@News18lokmat) March 28, 2021