इचलकरंजी येथील माजी उपनगराध्यक्षांना उघड्यावर लघुशंका केल्याच्या प्रकरणी दंड
पालिका प्रशासनाने अशी तत्परता नेहमीच दाखवावी !
इचलकरंजी – सार्वजनिक ठिकाणी लघुशंका केल्याच्या प्रकरणी इचलकरंजी नगरपालिकेतील एका माजी उपनगराध्यक्षाला घनकचरा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संबंधित कृत्य करतांना जागेवरच पकडून २०० रुपयांचा दंड केला. या प्रकरणी संबंधित उपनगराध्यक्षांचे छायाचित्र आणि दंडाची पावती सामाजिक माध्यमांद्वारे सगळीकडे प्रसारित झाल्यावर नगरपालिकेच्या या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केला आहे. (माजी उपनगराध्यक्षांसारखे लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारचे अयोग्य वर्तन करत असतील, तर सामान्य नागरिकांकडून योग्य वर्तनाची अपेक्षा ती काय ठेवणार ? – संपादक)