कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी हा उपाय नाही ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
पुणे, ३० मार्च – कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर दळणवळण बंदी हा उपाय नाही. आता दळणवळण बंदी केली तर सरकार एक रुपयांचे पॅकज देणार नाही. मागील एक वर्षभर लोकं कसे जगले हे समजणे कठीण आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दळणवळण बंदीला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम पाळले नाही तर दळणवळण बंदीची सिद्धता करा, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी वरील प्रतिक्रीया व्यक्त केल्या.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही चाचण्या वाढवल्या पाहिजेत. ज्याला काहीही लक्षण नाहीत त्यांचेही ‘टेस्टिंग’ करा. रुग्ण लवकर कळतील. त्यामुळे संसर्ग वाढणार नाही तसेच, उपचारांची केंद्रे वाढवा.’’