अण्णाद्रमुकच्या आमदाराच्या वाहनचालकाच्या घरावर टाकलेल्या धाडीमध्ये सापडले १ कोटी रुपये !
नवी दिल्ली – तमिळनाडूतील अण्णाद्रमुकचे आमदार आर्. चंद्रशेखर यांच्या वाहनचालकाच्या घरावर आयकर विभागाच्या विशेष अन्वेषण पथकाने धाड टाकून १ कोटी रुपये जप्त केले आहेत. अलगरासामी असे या चालकाचे नाव आहे. चंद्रशेखर यांच्या कोविलपट्टी गावातील थंगापंडी आणि मुरुगनंदम् या दोघा साथीदारांच्या घरावरही धाड टाकण्यात आली. निवडणुकांची घोषणा करण्यात आल्यानंतर तमिळनाडूच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केली जात आहे. (निवडणुकांच्याच वेळी अशा प्रकारच्या रकमा कशा काय सापडतात ? या पैशांचा निवडणुकीत कशासाठी वापर केला जातो, याची माहिती पोलीस आणि आयकर विभाग देईल का ? – संपादक)