आपल्या तलवारीच्या बळावर देव, देश आणि स्वधर्म यांचे रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज !
धर्माचे आणि वेदांचे रक्षण महाराजांनी केले, हे सांगणारा भूषण हा पहिला कवी आहे. कवी भूषण म्हणतात, ‘शिवाजी महाराजांनी वेद-पुराणांचे रक्षण केले. जिव्हेवर देवीचेनाम कायम ठेवले. खांद्यावरच्या जानव्याचे आणि गळ्यातल्या माळेचेही रक्षण केले. मोगलांना थोपवले. बादशहाला धाक घातला. शत्रूंना चक्की पिसायला लावली. आपल्या सरहद्दींचे रक्षण केले. महाराजांनी आपल्या तलवारीच्या बळावर देव, देश आणि स्वधर्म यांचे रक्षण केले.