चला साधकांनो चला । गुरुलीला सत्संगाला ॥

पुणे जिल्ह्यातील साधकांसाठी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक गुरुलीला सत्संग घेतात. ‘या वर्षी दिवाळीच्या १० – १२ दिवस आधीपासूनच भावपूर्ण दिवाळी साजरी करायची आहे’, अशी सूत्रे ताई घेत होती. या सत्संगामुळे अनेक साधकांनी गुरुस्मरणातील आनंद, साधनेतील सकारात्मकता, मनाच्या स्तरावरील पालट आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचा आनंद घेतला. या सत्संगाविषयी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती माधवी गोरेकाकूंना सुचलेली कविता पुढे दिली आहे.

सौ. मनीषा पाठक
श्रीमती माधवी गोरे

चला साधकांनो चला ।
गुरुलीला सत्संगाला ॥ धृ.॥

भावाची ज्योत प्रज्वलित करायला ।
कृपाळू गुरुमाऊलीचे दर्शन घ्यायला ।

भक्तीचा गोडवा चाखायला ।
प्रीतीमध्ये न्हाऊन निघायला ।
संघभावाचा फराळ करायला ॥ १ ॥

गुरुरायाचे पूजन करूया ।
आर्तभावाने साद घालूया ।
साधनेची भिक्षा मागूया ।
माऊली आपली प्रसन्न होईल ।
निर्मळ मनाची भेट देईल ॥ २ ॥

आनंदी फूल होऊन समर्पित होऊया ।
अलौकिक भेट, अलौकिक आनंद ।
हृदयमंदिरात जपून ठेवूया ।
गुरुचरणी बसूया ।
भक्तीरसात चिंब भिजूया ॥ ३ ॥

आत्मज्योत प्रज्वलित करूया ।
मधुर हास्य अनुभवूया ।
अखेर नतमस्तक होऊन ।
त्यांच्या चरणांत विलीन होऊया ॥ ४ ॥

ताई नेईल माऊलीच्या घरी ।
गुरुमाऊली घेईल तिच्या चरणी ।
नाही चिंता, नाही काळजी ।
शांत चित्ताने गुरुचरणी विसावूया ॥ ५ ॥

आनंद होईल गुरुमाऊलीला ।
खाऊ मिळेल पुणे जिल्ह्याला ।
आनंदाने फेर धरूया, नाचूया, गाऊया ॥ ६ ॥

माऊलीचे गुणगान करूया ।
गुरुनामात दंग होऊया ।
कृतज्ञतेने साजरी करूया ।
आध्यात्मिक दिवाळी ॥ ७ ॥

सकाळी मानसपूजेला बसले असतांना गुरुमाऊलीने वरील ओळी सुचवल्या. त्या त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.’

– श्रीमती माधवी गोरे, सातारा रस्ता, पुणे. (३०.११.२०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक