हे गुरुदेवा, मिळावा आपल्या चरणांशी विसावा ।

साधकांच्या साधनेला दिशा देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
सौ. अरुणा पोवार

हे गुरुदेवा,
कितीतरी जन्मांचे पुण्य फळाला आले ।
आपल्यासारखे थोर मार्गदर्शक गुरु लाभले ॥ १ ॥

त्या निर्गुण तत्त्वाने कार्य असे केले ।
सूक्ष्मातून हाताला धरून सत्संगाला नेले ॥ २ ॥

माया आणि ब्रह्म यांची करून दिली ओळख ।
त्यातूनच मनाला झाली साधनेची पारख ॥ ३ ॥

दिले एक एक साधक असे मार्गदर्शनाला ।
‘त्यांच्यात आपणच आहात’,
असा भास होई क्षणाक्षणाला ॥ ४ ॥

आता माझे लक्ष नको कुठे दुसरीकडे ।
नकोत नातीगोती ती नेणारी षड्रिपूंकडे ॥ ५ ॥

मिळू दे आपल्या चरणांशी विसावा ।
हेच मागणे आपल्या चरणी गुरुदेवा ॥ ६ ॥

– सौ. अरुणा पोवार, कोल्हापूर (१६.७.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक