बांगलादेशातील हिंसाचारामागे बंदी घातलेली जिहादी संघटना जमात-ए-इस्लामीचा हात !
एखाद्या संघटनेवर बंदी घातली म्हणजे तिचे कार्य संपत नाहीत, हे लक्षात घेऊन अशा बंदी घातलेल्या संघटनांचा पूर्णपणे निःपात करणे आवश्यक ठरते !
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौर्याच्या आधी आणि नंतर झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दौर्याला बांगलादेशातील धर्मांधांनी विरोध केला होता. या हिंसाचारामागे बंदी घातलेली संघटना जमात-ए-इस्लामी हिचा हात असल्याचे समोर आले आहे.
१. पोलीस, प्रसारमाध्यमे आणि सरकारी कार्यालये यांना लक्ष्य करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात जमात-ए-इस्लामीने पैसे वाटले होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावावरून पंतप्रधान शेख हसीना यांना घेरण्याचा यामागे उद्देश होता.
२. एका अहवालानुसार जमात-ए-इस्लामी आणि हिफाजत-ए-इस्लाम या संघटनांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या मालकीच्या ठिकाणांवर धाडी टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास त्यांना अटक करण्याचेही म्हटले आहे.