उत्तर कन्नडा भागातील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या मंदिरांतील सर्व उत्सव रहित
पणजी – श्री श्री श्री विद्याधिराज तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी उत्तर कन्नडा भागातील सर्व मंदिरांतील उत्सव, दिंडी उत्सव, वर्धंती उत्सव, कल्याणोत्सव आणि संतर्पण आदी कार्यक्रम ३० जुलै २०२१ पर्यंत रहित केल्याचा आदेश काढला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उत्सव रहित केल्याचे या आदेशात म्हटले आहे. कर्नाटक राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने त्या ठिकाणच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शासनाच्या सूचनेवरून उत्सव रहित करण्यात आले आहेत.