गोव्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे १००हून अधिक रुग्ण
पणजी, २९ मार्च (वार्ता.) – राज्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचा संसर्ग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या १०० हून अधिक आढळली आहे. राज्यात २९ मार्च या दिवशी कोरोनाबाधित १२८ नवीन रुग्ण आढळले, तसेच मागील २४ घंट्यांमध्ये कोरोनामुळे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामुळे मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८२८ वर पोेचली आहे. राज्यात २९ मार्च या दिवशी १०१ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४२९ झाली आहे.