रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध लोकप्रतिनिधींना निवेदन
सांगली – रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा घालणे, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध लोकप्रतिनिधी यांना निवेदन सादर करण्यात आले. यात भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ, नगरसेविका सौ. सुनंदा राऊत, सौ. उर्मिला बेलवलकर, नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांचा प्रामुख्याने समावेश होता.
विशेष : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीमती मधुरा तोफखाने यांनी निवेदन दिल्यानंतर नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर यांनी निवेदन देतानांचे छायाचित्र त्यांच्या ‘व्हॉट्सअॅप’च्या ‘स्टेटस’ला ठेवले होते. होळी-रंगपंचमीचे प्रबोधनपर असलेले ‘ई-पत्रक’ मी इतरांना पाठवीन, तसेच फेसबूक पृष्ठावर ठेवून सण आदर्श पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करीन’, त्यांनी सांगितले.