भक्तांचे अनुसंधान राखणारे प.पू. रामानंद महाराज !
निर्मळ रूप रामानंद ।
दिला निखळ भजनानंद ॥
तीर्थ भ्रमण करविले ।
चित्त ते स्वस्थ केले ॥
भंडारा अखंड घातला ।
कृपाप्रसाद हाती दिला ॥
वार्तालाप बहुत केला ।
शुद्ध ज्ञानांजन दिले ॥
टाळ चिपळ्यांच्या नादातून ।
नाम गजर चालविला ॥
लक्ष लक्ष ठेवुनि ।
भक्तांचे अनुसंधान राखिले ॥
– ऋषिकेश जोशी, मुंबई
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |