एका हिंदु महिलेस अजमेर दर्गा येथून पाठवले पोस्ट पार्सल
असे पत्र पाठवण्याचा अन्य धर्मियांचा नक्की उद्देश कोणता आहे, हे जाणा !
रत्नागिरी – जिल्ह्यातील एका हिंदु महिलेस पी.एम्. ख्वाजा, हाजी सय्यद इस्लामुद्दीन चिस्ती १५३, मदिना तळ हिंद, डोलीवाला चौक, दर्गा शरीफ अजमेर या पत्त्यावरून पोस्ट पार्सल स्वरूपात पत्र आले आहे. या पार्सलवर हिंदु महिलेचा संपूर्ण पत्ता आहे. यामध्ये एका प्लास्टिक पिशवीत गुलाबाच्या पाकळ्या आणि प्रसादासारखी वस्तू असून अजमेर येथे होणार्या उरुस संदर्भात एक माहितीपत्रकही आहे.
खरेतर या महिलेने स्वतःहून अशा कोणत्याही अन्य धर्मीय संस्थेकडे दुरान्वयानेही कधी संपर्क केलेला नाही. त्यामुळे अजमेर दर्गा येथून आलेले पत्र पाहून त्या महिलेला आश्चर्याचा धक्का बसला; मात्र अशा तर्हेने अन्य धर्मीय संस्थेकडून एका हिंदु महिलेच्या नावाने असे पार्सल स्वरूपात पाठवण्याचा हेतू लक्षात घ्यायला हवा. (अजमेर दर्ग्याकडून अनेक हिंदूंना गेल्या अनेक वर्षांपासून अशी पत्रे पाठवली जात आहेत. काही पत्रांसमवेत ‘मनीऑर्डर’चा फॉर्मही दिलेला असतो. त्यामुळे अनेक हिंदू या दर्ग्यासाठी रक्कमही पाठवतात. यातून हिंदूंच्या भोळ्या आणि श्रद्धावान स्वभावाचा अपलाभ, तर अन्य धर्मीय उठवत नाहीत ना ? अशी हिंदुत्वनिष्ठांना शंका येणे रास्त आहे. यातून अन्य धर्मियांची हुशारीच दिसून येते. अशा प्रकारांपासून हिंदूंनी सतर्क रहावे ! – संपादक)