निवती समुद्रात अवैध मासेमारी करणारा कर्नाटकातील हायस्पीड ट्रॉलर पकडला
मालवण – मत्स्यविभागाच्या येथील पथकाने २७ मार्चला मध्यरात्री ‘शीतल’ या गस्तीनौकेच्या साहाय्याने महाराष्ट्राच्या सागरी सीमेत वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ १८ वाव अंतरात अनधिकृतरित्या मासेमारी करणारा कर्नाटकातील उडपी बंदरातील हायस्पीड ट्रॉलर पकडला आहे. मत्स्यविभागाचे अतिरिक्त साहाय्यक आयुक्त रवींद्र मालवणकर यांच्या नेतृत्वाखाली सागरी सुरक्षा पथक आणि पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.