अल्पवयीन मुलीचे अश्लील चित्रीकरण करणार्या युवकावर गुन्हा नोंद
कणकवली – तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अश्लील चित्रीकरण केल्याच्या प्रकरणी एका संशयित युवकास पोलिसांनी कह्यात घेतले आहे. (समाजात अशा प्रकारांना ऊत आला असून प्रतिदिन महिलांशी संबंधित अशा विविध घटना घडत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावी नीतीमत्ता लोप पावत असल्याने समाजाची झपाट्याने अधोगती होत असल्याचे हे लक्षण आहे. सरकारने वेळीच सावध होऊन नीतीमान समाजनिर्मितीसाठी प्रयत्न न केल्यास जगासाठी आजही ईश्वराची, संतांची भूमी म्हणून आदर्श असलेल्या भारतात अराजक निर्माण होण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक)
या युवकाने यापूर्वी काही दिवस त्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते. त्या मुलीच्या नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयित युवकास कह्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील या करत आहेत.