वाहनाच्या संदर्भातील कागदपत्रांच्या नूतनीकरणाला मुदतवाढ
नवी देहली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.
Govt extends validity of vehicle documents like DL, RC, permits till Mar 31 https://t.co/3EzPYs8C0Y #DrivingLicence
— Oneindia News (@Oneindia) December 27, 2020
ज्या वाहनधारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पीयूसी किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे किंवा ३१ मार्च २०२१ या दिवशी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे. या मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.