कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये २५ लाख लोक बाधित होणार ! – स्टेट बँकेच्या संशोधनाचा निष्कर्ष

नवी देहली – भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्च पॅनेलने ही दुसरी लाट पुष्कळ धोकादायक असण्याची भीती व्यक्त केली आहे.

या दुसर्‍या लाटेत २५ लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित होण्याची शक्यता वर्तवली आहे. ही लाट १५ फेब्रुवारीपासून चालू झाली असून मेपर्यंत ती चालू राहील, असे या पॅनेलने अहवालात म्हटले आहे. ‘लसीकरण चालू असतांनाही संक्रमणाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक सिद्ध होऊ शकते’, असे म्हटले जात आहे. आकडेवारीचा विचार करता कोरोनाची दुसरी लाट एप्रिल मासात शिगेला पोचेल.