मांजरा धरणाचा उजवा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले
पाटबंधारे विभागाचे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष
केज (जिल्हा बीड) – तालुक्यातील मांजरा धरणातून शेती सिंचनासाठी पाणी देण्याच्या उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने २६ मार्च या दिवशी त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. तालुक्यातील मांजरा धरण हे बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी सिंचन आणि पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान ठरले आहे, तसेच या वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
पाटबंधारे विभागाचे कालव्याची दुरुस्ती आणि देखभाल यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कालव्याची तात्काळ दुरुस्ती करून नियमित शेतीच्या सिंचनासाठी कालव्यातून पाणी आवर्तने सोडण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. (ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत कालवा फुटणे पाटबंधारे विभागासाठी लज्जास्पद आहे. कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)