पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा संपल्यावर तेथील धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे !
|
कॉक्स बाजार (बांगलादेश) – बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यासाठी बांगलादेशच्या दौर्यावर गेलेले भारताचे पंतप्रधान भारतात परतताच बांगलादेशातील धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरांवर, तसेच हिंदूंवरही आक्रमणे केली, असे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्याला येथील धर्मांधांच्या संघटनांनी विरोध करत हिंसाचार केला होता. यात १० जणांचा मृत्यू झाला होता.
१. ब्राह्मणबारिया जिल्ह्यातील पत्रकार जावेद रहीम यांनी सांगितले की, ब्राह्मणबारियामध्ये प्रचंड जाळपोळ केली जात आहे. अनेक सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली आहे. येथील प्रेस क्लबवरही आक्रमण करण्यात आले. यात अनेक जण घायाळ झाले आहेत. यात प्रेस क्लबच्या अध्यक्षांचाही समावेश आहे. येथील लोक घाबरलेले आहेत. हिंदूंच्या अनेक मंदिरांवर आक्रमण करण्यात आले आहे.
२. हिफाजात-ए-इस्लाम या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ब्राह्मणबारिया जिल्ह्यामध्ये एका रेल्वेगाडीवर आक्रमण केले. यात १० जण घायाळ झाले.