दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच !
‘दुष्टांना क्षमा करणे, हा क्षमेचा अतिरेक आणि दुरुपयोगच होय.’ भारतातील सोमनाथ आदि मंदिराचे भग्न अवशेष हे सौजन्य, शांती आणि क्षमा यांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम व्यक्त करतात. अतिरेकाचे आणि दुष्टांविषयी शांती दाखवल्याने त्यांचा स्वभाव, तर पालटणार नाहीच; पण त्यामुळे आत्मनाश होण्याची शक्यताच अधिक ! प्रतिकार केल्याने त्यांच्या स्वभावात सुधारणा होणार नसली, तरी त्यामुळे सज्जनांचे संरक्षण होईलच होईल. याउलट आपण त्यांच्याविषयी शांती आणि प्रेम दाखवत राहिलो, तर त्यांची वृत्ती न सुधारता, त्यांच्या अविवेकी वृत्तीस पायबंद न बसता ती वाढत जाऊन आपले प्रयत्न विफल होऊन, हानीही होईल.’
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘श्रीधर संदेश’, डिसेंबर १९९२)