माझे गुरु जगात थोरले ।
साधकांसाठी सर्वकाही करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
करून स्वतः रहाती नामानिराळे ।
असे माझे गुरु जगात ‘थोरले ’।
सदा त्यांच्या हृदयी साधकांचेच गोडवे ।
असे गुरु मला भाग्यानेच लाभले ॥ १ ॥
सदा चिंतती ते साधकांचेच भले ।
त्यांच्यापुढे आम्ही सदैव धाकुले ।
भुलतो आम्ही त्यांच्या प्रीतीच्या जाळ्यात ।
तळमळते जशी मासोळी जळाविण तळ्यात ॥ २ ॥
– श्री. मुकुंद ओझरकर, नाशिक (२४.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |