कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू

पणजी- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिकरित्या एकत्र येणे टाळण्यासाठी राज्यभरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी हा आदेश काढला आहे. होळी, ईस्टर, ईद हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात मनाई असेल.

राज्यात दिवसभरात १७० नवीन कोरोनाबाधित

पणजी – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. २७ मार्चला दिवसभरात कोरोनाविषयक २ सहस्र ४७९ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी  १७० नवीन कोरोनाबाधित आढळले. ६९ रुग्ण बरे झाले. त्यामुळे सध्या प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १ सहस्र ३७९ झाली आहे. राज्यातील पणजी (१७८), मडगाव (१३४), फोंडा (११३), पर्वरी(१२१), वास्को(१०५) आणि कांदोळी (१०४) या ६ आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १०० हून अधिक झाली आहे.