पुण्यातील ‘फॅशन स्ट्रीट’ भागात भीषण आग !

पुणे, २७ मार्च (वार्ता.) – येथील ‘फॅशन स्ट्रीट’ भागात २६ मार्चच्या रात्री भीषण आग लागली. आगीमध्ये ५०० दुकाने जळली, तसेच व्यावसायिकांच्या लाखो रुपयांची हानी झाली आहे. आग लागल्याचे समजल्यानंतर अग्नीशमनाच्या १५ हून अधिक गाड्या घटनास्थळी आल्या. परिसरातील रहिवासी इमारतींतून लोकांना सुखरूप बाहेर काढत होते. रात्री १ वाजता आगीवर नियंत्रण मिळाल्याचे, तसेच कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्नीशमन विभागाचे मुख्य अग्नीशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी कळवले आहे.