देवतांचे चैतन्य ग्रहण करून देणारे अलंकार !
१. ‘अलंकार म्हणजे ईश्वरी तत्त्व ग्रहण करून जिवाला त्याचा लाभ करून देणारा प्रणेता.
२. अलंकार धारण केल्याने देवतांचा चैतन्यदायी ऊर्जाशाक्तीचा स्रोत देहात ग्रहण होऊन जिवाला कार्य करण्यास चालना मिळते.’
– एक अज्ञात शक्ती (सौ. रंजना गडेकर यांच्या माध्यमातून, (२०.३.२००८), दुपारी १.४७ आणि २.१४)
३. ‘शरिराच्या त्या त्या भागात तो तो अलंकार घालणे, म्हणजे सगुणत्वाच्या माध्यमातून ब्रह्मांडमंडलात देवतेचे त्या त्या वेळी कार्यरत असणारे तेजरूपी चैतन्य ग्रहण करण्यात सुलभता येणे.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१२.२००७, दुपारी २.४९)
४. ‘अलंकार हे मनुष्याच्या शरिरावर त्याच्या सौंदर्यामुळे नव्हे, तर ईश्वराकडून त्याला मिळणार्या चैतन्यामुळेच शोभतात !’
– परात्पर गुरु परशराम माधव पांडे महाराज.
|