सौभाग्य हेच खरे स्त्रीचे सौंदर्य !
‘सौभाग्य आणि सौंदर्य एकच आहेत. सौभाग्य गेले की, सौंदर्य मावळते. सौंदर्याचा अधिकार उरतच नाही. विवाहाच्या वेळी देवतांची प्रार्थना करतांना सौभाग्याचे वरदान मागायचे असते. विवाह सोहळ्यात ‘सौभाग्यमस्यै दत्त्वायाथास्तं वि परेतन ।’ म्हणजे ‘हे देवतांनो, ही वधू सौभाग्यवती होवो’, असा तिला आशीर्वाद देऊन मग आपापल्या स्थानी परत जा.’ अशी प्रार्थना आहे. त्या वेळी वर अभिवचन देतो, ‘गृभ्णामि ते सौभगत्वाय हस्तं ।’ म्हणजे ‘हा तुझा हात मी तुझ्या सौभाग्यासाठी आपल्या हाती धरतो.’ पतीनिधनानंतर पत्नी सती जाते, तेव्हा ती सुवासिनी एखाद्या नवपरिणित वधूसारखी सजते, नटते, शृंगार करते, पतीच्या चितेवर चढते. विवाह होऊन वरात सासरी येते, तेव्हा घराच्या उंबरठ्यावरचे माप उलथून
नववधू गृहप्रवेश करते. सती जातांना ती नववधूप्रमाणे शृंगार करून सती जाते. चिताकुंडात सौंदर्याची आहुती देते. इथे दिव्य रहस्य आहे. हा परमोदात्त आणि रोमांचक प्रसंग आहे. या सौभाग्याची, सुंदरतेची ज्याला जाण नाही, त्याने स्त्री जीवनाच्या वार्यालाही उभे राहू नये. त्याची ती क्षमताच नाही !’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २.७.२००९)