स्थुलातील अलंकार आणि विरक्ती

सौ. शकुंतला बद्दी

साधना करतांना सूक्ष्मातून आनंद मिळत असतांना स्थुलातून अलंकार परिधान करण्याची इच्छा न उरणे : ‘एकदा माझ्या मुलीने मला न सांगताच माझ्यासाठी सोनाराला कर्णफुले करण्यास सांगितली. नंतर तिने मला सांगितले, ‘‘तू कर्णफुलांवरील वेलवीणची (नक्षीची) निवड करून ये.’’ मी म्हटले, ‘‘आता मला सुवर्णाचीच काय, कशाचीच इच्छा उरली नाही. कशासाठी हा खटाटोप ?’’ त्यावर ती काहीच बोलली नाही. ती गेल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘गुरूंनी माझ्या अपवित्र देहाला पवित्र करून तो अनेक अलंकारांनी मढवलेला आहे.’

१. डोक्यावर त्यागाचा मुकुट चढवला आहे.

२. केसांत सद्विचार आणि प्रीती यांचा गजरा माळला आहे.

३. कानांत ब्रह्मज्ञानाची कर्णफुले घातली आहेत.

४. नाकात हिंदु धर्माची नथ घातली आहे.

५. गळ्यात नामाची बोरमाळ घातली आहे.

. जिभेवर सरस्वतीला स्थान देऊन वाणीचे सौंदर्य वाढवले आहे.

७. दंडावर क्षात्रबळाचा बाहूबंद घातला आहे. हातात सत्सेवेच्या बांगड्या घातल्या आहेत.

८. पायांत नाद आणि मर्यादा यांचे पैंजण घातले आहेत.

९. गुरुकृपेचा भरजरी शालू नेसवून सर्वच अवयव सुशोभित केले आहेत; म्हणूनच अंतःकरणातून निघणारा ईश्‍वरी कृपेचा सुवर्णप्रकाश माझ्या नेत्रांतून बाहेर पडून इतरांनाही साधनेस प्रवृत्त करत आहे.’ त्यानंतर ‘मला अलंकारांची इच्छा का उरली नाही’, याचे कारण लक्षात आले.’

– सौ. शकुंतला बद्दी, मुंबई.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक