दाणोली येथील प.पू. साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव साधेपणाने साजरा होणार
सावंतवाडी – दाणोली येथील प.पू. साटम महाराज यांचा ८४ वा पुण्यतिथी सोहळा ३० मार्च या दिवशी साजरा होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यावर्षी शासनाच्या नियमांचे पालन करून श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि सेवेकरी यांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. सोहळ्याला भाविकांनी गर्दी न करता ज्या ठिकाणी असाल तेथूनच श्री समर्थ साटम महाराज यांना नमस्कार करावा, असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंत भोसले यांनी केले आहे.