होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांविरुद्ध हिंदु जनजागृती समितीची मोहीम !
अशी निवेदने का द्यावी लागतात ? प्रशासन स्वतःहून हे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न का करत नाही ? |
सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत पोलीस आणि प्रशासनाला निवेदन
सोलापूर, २६ मार्च (वार्ता.) – होळी आणि रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यात यावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांनी प्रशासन अन् पोलीस यांना निवेदन दिले. सोलापूर येथील निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी धनंजय गोरंटला यांसह हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश आवार, श्री. बालराज दोंतुल, श्री. विनोद रसाळ आदी उपस्थित होते.
लातूर – येथील निवासी नायब तहसीलदार राजेश जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश पाटील आणि धर्मप्रेमी बालाजी बनसोडे आदी उपस्थित होते.
धाराशिव – येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री संतोष पिंपळे, मनोज काकडे, भगवान श्रीनामे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
फलटण (जिल्हा सातारा) – येथील नायब तहसीलदार आर्.पी. पाटील यांनी निवेदन स्वीकारले, तर फलटण पोलीस ठाणे येथे ठाणे अंमलदार रमेश फरांदे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मंगेश खंदारे, सुहास काशिद, प्रदीप जाधव, उदय ओझर्डे, श्रीमती डोईफोडे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – येथील नायब तहसीलदार एन्.एच्. वाकसे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. स्मिता महाजन आणि सनातन संस्थेच्या साधिका सौ. सुमिता रत्नपारखी उपस्थित होत्या.
गडहिंग्लज येथे निवेदनाद्वारे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे विविध मागण्या
गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – होळीच्या उत्सवाला सध्या काही ठिकाणी विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी तोंडास काळे फासणे, मद्यपान करून धिंगाणा घालणे, असे अनेक हिडीस प्रकार घडतांना दिसून येतात. रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे, तसेच आरोग्याला घातक असणारे रंग किंवा डांबर फासणे, अंडी फेकून मारणे आदी प्रकार वाढत चालले आहेत. तरी होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या गैरप्रकारांना आळा घालणे, तसेच महिला सुरक्षेसाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी २५ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर, पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी हलबागोळ, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री वामन बिलावर, व्यंकटेश बिलावर, अमोल बिलावर उपस्थित होते.
अवैधरितीने चायनीज रंग, पिचकार्या, रंगांचे फुगे यांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावरही प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
मिरज येथे हिंदुत्वनिष्ठांकडून नायब तहसीलदारांना निवेदन
मिरज (जिल्हा सांगली) – मिरज येथे नायब तहसीलदार संजय इंगळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन भोसले, युवा सेनेचे श्री. अक्षय मिसाळ, सनातन संस्थेचे श्री. शरद भंगाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण कुलकर्णी आणि श्री. गिरीश पुजारी उपस्थित होते.