रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याची नाशिकच्या कारागृहात ठेवण्याची मागणी
नगर – पत्रकारिता करतांना ज्यांचे घोटाळे बाहेर काढले, ज्यांच्या विरोधात बातम्या दिल्या, त्यातील काही आरोपी नगर आणि येरवडा कारागृहात आहेत. मलाही त्याच ठिकाणी ठेवले, तर माझ्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे मला नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात यावे, अशी मागणी रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांनी केली आहे. बोठे यांच्या अधिवक्त्यांनी पारनेरच्या न्यायालयात हा अर्ज केला आहे.
आरोपीला दुसर्या गुन्ह्यात वर्ग करून नगरच्या न्यायालयात नेण्यात येणार आहे. त्यामुळे या अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. नगरमधील २ गुन्ह्यांसंबंधी आधी निर्णय होऊन आधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतरच आरोपीला पुन्हा पारनेरच्या गुन्ह्यात नेण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची वेळ आल्यानंतरच या अर्जावर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे.