गोव्यात दिवसभरात कोरोनाबाधित १८९ नवीन रुग्ण : मागील ३ मासांतील उच्चांक
पणजी, २५ मार्च (वार्ता.) – गोव्यात २५ मार्च या दिवशी कोरोनाबाधित १८९ नवीन रुग्ण सापडले. मागील ३ मासांतील हा एक उच्चांक आहे. राज्यात २५ मार्च या दिवशी कोरोनाविषयक एकूण २ सहस्र १९० चाचण्या करण्यात आल्या. एकूण चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या ८.६ टक्के आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने राज्यात २५ मार्च एकाचा मृत्यू झाला आणि यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या ८२२ वर पोचली आहे. २५ मार्च या दिवशी कोरोनापासून ६६ जण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या आता १ सहस्र २७८ वर पोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या पणजी (१६९ रुग्ण), फोंडा (११९ रुग्ण), मडगाव (११९ रुग्ण), पर्वरी (११४ रुग्ण), कांदोळी (९१ रुग्ण) आणि वास्को (८५ रुग्ण) येथे नोंद झाली आहे.