भारतमातेच्या स्वतंत्रतेची शपथ घेणार्या सावरकरांप्रमाणे हिंदु राष्ट्राची शपथ घेणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर
नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जशी अष्टभुजा देवीच्या समोर भारतमातेच्या स्वतंत्रतेची शपथ घेतली, त्याचप्रमाणे आपणही आता हिंदु राष्ट्राची शपथ घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार स्मृतीदिनानिमित्त जिल्ह्यात ‘गाथा शौर्याची आणि सावरकरांच्या मनातील आदर्श हिंदु राष्ट्र’ या ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. एक धर्मप्रेमी मनोगतात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी सांगतांना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
२. भगुर या सावरकरांच्या जन्मस्थळाहूनही काही धर्मप्रेमी व्याख्यानाला जोडले होते.