रुग्णावर उपचार करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी पुणे येथील आधुनिक वैद्याला अटक
असे लाचखोर वृत्तीचे आधुनिक वैद्य रुग्णावर कसे उपचार करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
पुणे – पवना रुग्णालयामध्ये शासकीय योजनेअंतर्गत विनामूल्य ‘डायलिसिस’ उपचार करण्यात येतात. असे असतांना सुद्धा डॉ. सत्यजित वाढोकर यांनी उपचार करण्यासाठी तक्रारदाराकडे १० सहस्र रुपयांची लाच मागितली. रुग्णाच्या नातेवाइकाकडून ९ सहस्र रुपयांची लाच घेतांना डॉ. वाढोकर आणि खासगी मार्केटिंग ऑफिसर प्रमोद निकम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २३ मार्च या दिवशी अटक केली. याविषयी एका ३३ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली होती. (समाजाची नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हे या घटनेतून लक्षात येते ! – संपादक)