पेण येथील अँबिशन मंडळाच्या माध्यमातून सिंहगडाची स्वच्छता मोहीम
प्रतिमास गड स्वच्छता मोहीम राबवून युवा पिढीला गड संवर्धनासाठी उद्युक्त करणार्या अँबिशन मंडळाचे अभिनंदन !
पेण (रायगड), २५ मार्च (वार्ता.) – येथील महाडिकवाडी आणि वडगाव विभागातील अँबिशन मित्र मंडळाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या स्वच्छतेची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये श्री. संतोष म्हात्रे यांच्या पुढाकाराने मंडळातील २४ युवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. गडावर सूचना फलक लावले असतांनाही त्या ठिकाणी कचरा होत आहे. युवकांनी केलेल्या स्वच्छतेत प्लास्टिकच्या किंवा मद्याच्या बाटल्या, तसेच खाद्यपदार्थांची टाकाऊ पाकिटे आदी पाच गोणी भरून कचरा गोळा करण्यात आला. (हिंदूंनो, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि वीर योद्ध्यांच्या पराक्रमानेे पावन झालेल्या गडावर स्वच्छता राखणे, हे राष्ट्रकर्तव्य असून हीच छत्रपती शिवरायांना मानवंदना ठरणार ! गडांचे संरक्षण आणि संवर्धन यांसाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक)