पुणे येथील सिस्का आस्थापनाच्या गोदामाला भीषण आग
पुणे – वाघोलीतील कटकेवाडी येथील सिस्का आस्थापनाच्या गोदामाला २३ मार्चच्या रात्री ८ वाजता आग लागली. हे गोदाम अनुमाने ८ ते १० सहस्र चौरस फुटांचे आहे. २४ मार्च या दिवशी दुपारी ४ पर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम चालू होते. २० ते २५ अग्नीशमनदलाच्या गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. गोदामात असलेल्या ट्यूब, बल्ब इत्यादी इलेक्ट्रिकल वस्तूंमुळे आग धुमसत होती. याविषयी पोलिसात दुपारपर्यंतही सविस्तर माहिती देण्यात आलेली नव्हती.