भारत ‘कोविशील्ड’ची निर्यात न करता देशांतर्गत लसीकरणावर अधिक लक्ष देणार !

नवी देहली – भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने आता भारत सरकारने ‘स्ट्राझेनेका’ची लस इतर देशांना निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने देशांतर्गत लसीकरणावर अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात स्ट्राझेनेका-ऑक्सफर्डच्या लसीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ‘कोविशील्ड’ नावाने करत आहे.