रस्त्यावरील नमाजपठण आणि मशिदींतील भोग्यांवरून होणारी अजान बंद करण्याची मागणी !
झारखंड उच्च न्यायालयात भाजप कार्यकर्त्याने प्रविष्ट केली जनहित याचिका !
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना त्यांनी अशा प्रकारची बंदी घातलेली नाही. त्यांनीही अशी बंदी घालावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
रांची (झारखंड) – भाजपचे कार्यकर्ते अनुरंजन अशोक यांनी झारखंड उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करून रस्त्यावर केले जाणारे नमाजपठण आणि मशिदींवरील भोंग्यांवरून होणारी अजान यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या याचिकेचा संबंध धर्माशी नाही, तर ध्वनीप्रदूषणासारख्या समस्येशी लढण्यासाठी असून ते आवश्यक आहे.
१. अशोक यांनी म्हटले की, भोंग्यांचा आवाज १० डेसीबलच्या आत असला पाहिजे; मात्र मशिदींकडून याचे सातत्याने उल्लंघन केले जात आहे. गेल्यावर्षी सरकारकडे याविषयी मागणी केली होती; मात्र सरकार निष्क्रीय राहिल्याने न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
The petitioner claimed that his plea has “nothing to do with religion” and was meant to combat the common problem of noise pollution | #Jharkhand #Loudspeakers | @satyajeetAT https://t.co/Oy12CWBsLZ
— IndiaToday (@IndiaToday) March 24, 2021
२. अशोक यांनी रस्त्यांवर केल्या जाणार्या नमाजपठणाविषयी म्हटले की, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. यामुळे नमाजापठण केवळ मशिदींमध्येच केले पाहिजे.