सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी भावजागृतीचे प्रयत्न परिणामकारक होण्यासाठी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेली ‘भाव’सूत्रे !
२९.१२.२०१९ या दिवसापासून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये काही साधकांंच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत आहेत. या आढाव्यात त्यांनी सांगितलेली ‘भाव’सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘कापूर लावतांना ‘श्रीकृष्णाच्या चरणांची धूळ लावत असून श्वासावाटे चैतन्य आत जात आहे. त्यामुळे निराशा, मरगळ आणि नकारात्मकता नष्ट होत आहे’, असा भाव अनुभवावा.
२. ‘कापूर म्हणजे शिवाचे भस्म आहे’, या भावाने तो लावावा.
३. ‘अत्तर लावतांना श्रीकृष्णाच्या चरणांचे तीर्थ लावत आहोत’, असा भाव ठेवावा.
४. ‘आवरण काढणारे हात माझे नसून श्रीकृष्णाचे हात आहेत’ आणि ‘श्रीकृष्णच माझ्यावरील आवरण काढत आहे’, असा भाव ठेवावा.
५. श्रीकृष्णाच्या मुकुटाच्या स्पर्शामुळे मोरपीस चैतन्याचे भांडार बनले आहे.
६. सनातन-निर्मित उदबत्ती म्हणजे देवाने दिलेले सात्त्विक शस्त्र आहे.
७. नामजप करतांना सर्व अवयवांना प्रार्थना करावी, ‘त्यांनाही मोक्षाला जायचे आहे’, याची आठवण करून द्यावी. त्यांना कृतज्ञताभावात रहाण्यास सांगावे.
८. नामजप करतांना सर्व अवयवांवर नाम लिहावेे. नाम लिहिल्यावर त्रासदायक आवरण नष्ट होऊन मन एकाग्र होते आणि नामजप एकाग्रतेने होतो. मनात अन्य विचार येत नाहीत. नाम लिहितांना मन नामात रहाते. त्यामुळे अधिक लाभ होतो.
९. ‘दिवसभरात अवयवांनी कसे रहावे ? त्यांनी कशी साधना करावी ?’, यांसाठी अवयवांना प्रार्थना करावी, उदा. डोळ्यांना सतत साधकांचे गुण पहायला सांगावे. मला त्यांचा स्वभावदोष दिसला, तर ‘मी अशी कुठे कुठे वागते ?’, याचा विचार करून स्वतःची चूक सुधारण्यासाठी चिंतन करून त्यात पालट करावा.’
– व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील साधक
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |