बांदा येथे पोलिसांनी ५० लाख रुपयांच्या अवैध मद्याची वाहतूक रोखली
सावंतवाडी – गोवा येथून पुण्याकडे जाणारा कंटेनर पोलिसांनी बांदा येथील पोलीस तपासणी नाक्यावर तपासणीसाठी थांबवला. या वेळी कंटेनरमध्ये सापडलेला ५० लाख रुपयांचा मद्याचा साठा आणि कंटेनर, असा एकूण ५५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी कह्यात घेतला. गेल्या काही मासांतील पोलिसांनी केलेली ही अवैध मद्याच्या विरोधातील मोठी कारवाई आहे.