बायोएन्टेक आस्थापन कोरोनानंतर कर्करोगावर लस बनवत आहे !
बर्लिन (जर्मनी) – अमेरिकेतील फायजर आस्थापनासमवेत कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवणार्या जर्मनीतील ‘बायोएन्टेक’ आस्थापनाने आता कर्करोगावर लस आणणार असल्याचे म्हटले आहे. बायोएन्टेकच्या सह-संस्थापक डॉ. ओझलेम ट्यूरेसी यांनी सांगितले की, येत्या काही वर्षांत आम्ही कर्करोगाची लस विकसित करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बायोएन्टेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओजलेम तुरेसी गेल्या २० वर्षांपासून कर्करोगाच्या उपचारासाठी संशोधन करत आहेत. या संशोधनामुळे बनवण्यात येणारी लस कर्करोग होण्याआधीच शरिराला त्याच्याशी लढण्याची शक्ती देईल. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना किमोथेरपी आणि रेडिओथेरपी यांपासून होणार्या असह्य वेदना, तसेच केस गळणे, भूक न लागणे, वजन घटणे यांंपासूनही मुक्ती मिळेल.