अयोध्येत श्रीराममंदिराचा पाया खोदतांना सापडल्या मूर्ती आणि चरणपादुका !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – सध्या श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिर उभारण्यासाठी भूमीचे सपाटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी खोदकाम करतांना प्राचीन ‘सीतामाता की रसोई’ मंदिर स्थळी चरणपादुका, चौकट आणि खंडित देवमूर्तींचे अवशेष आढळून आले.

यापूर्वीच्या खोदकामामध्ये अनेक स्तंभ, शिवलिंग इत्यादी प्राचीन अवशेष सापडले होते.