विरक्त असलेल्याने जिभेचे चोचले न पुरवता जीभ आवरावी !

प.प. भगवान श्रीधरस्वामी

‘विरक्ताने जीभ आवरावी. ‘सर्वं जितं जिते रसे’ ज्यांना गोड-गोड अथवा मसाल्याचे चमचमीत चटकदार पदार्थ त्यातही विशेष तळलेले, करपलेले, खुसखुशीत पदार्थ खाण्याची प्रीती (आवड) असते, असे संसार सोडून प्रथम विरक्त दिसले, तरी शेवटी त्यांचे ब्रह्मचर्य नष्ट झालेले, असे कितीतरी ऐकले आणि पाहिलेही आहेत. जिव्हा आणि उपस्थ या दोन इंद्रियांचा कांंहीतरी विलक्षण प्रेमसंबंध आतून आहे. विष पिऊनही सुखाने असणारे ‘शंकर’ कुणी असतील, तर असोत. नियमाला अपवाद असतो, तरी पण प्राय: (प्रथमतः) असेच दिसून येते. निःस्पृहाने जिभलीचे (जिभेचे) चोचले पुरवत बसू नये.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक, ‘श्रीधर संदेश’, एप्रिल १९९०)