राज्यात कोरोना लसीचे डोस पडून नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण !
पुणे – केंद्र सरकारकडून मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस पडून नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. ते कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यात ३ लाख डोसचे लसीकरण होत असून आता खासगी रुग्णालये आणि ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांवरही लसीकरण चालू करणार आहे. सरकारी आरोग्य संस्थांची रुग्णालये, वैद्यकिय महाविद्यालयांची रुग्णालये, महापालिकांचे दवाखाने या सर्वांमध्ये मिळून प्रतिदिन २ सहस्र ४०० रुग्णालयांमध्ये लसीकरण चालू असून ६०० खासगी रुग्णालयांनाही मान्यता दिली.’’