साधकांमध्ये आज्ञापालनाची वृत्ती निर्माण झाल्याने ते अधिकारी व्यक्तींचा समादेश कृतीत आणू शकणे
साधनेचे महत्त्व
‘एका साधकाची आई पक्षाघातामुळे आजारी असते. तिच्या शरिराची उजवी बाजू कमकुवत झाली आहे आणि तिला बोलताही येत नाही. एकदा तिला दाढदुखीच्या तीव्र वेदना चालू झाल्या होत्या. त्या वेळी तिला जवळच्या दंतवैद्यांकडे तपासायला नेले असता त्यांनी सांगितले, ‘‘त्यांच्या तीन दाढा खराब झाल्या आहेत आणि दाढेचा वरचा भाग तुटून तिचे केवळ काही तुकडे शिल्लक आहेत. वेदना न्यून झाल्यावर त्या दाढा काढाव्या लागतील.’’ दाढदुखी थांबण्यासाठी वैद्यांनी दाढेत घालण्यासाठी औषधे दिली आणि काही गोळ्या दिल्या. ती औषधे घेतल्यावर साधकाच्या आईला होणार्या दाढेच्या वेदना पूर्ण थांबल्या. त्यानंतर तिला वैद्यांनी दाढ काढण्यासाठी बोलावले; परंतु वेदना थांबल्यावर ती दाढ काढण्यासाठी सिद्ध झाली नाही. प्रत्यक्षात त्या दाढा काढणे अत्यंत आवश्यक होते; कारण त्या पुन्हा दुखणे केव्हाही चालू होऊ शकते.’ – एक साधक (१०.०१.२०२१)
(साधक साधना करत असल्यामुळे त्यांच्यात ‘आज्ञापालन करणे’ हा गुण निर्माण होतो. त्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने, उदा. वैद्यकीय क्षेत्रात वैद्यांनी आजारपणाविषयी दिलेल्या समादेशाचे लगेच आज्ञापालन करतात; परंतु काही साधकांचे नातेवाईक साधना करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात इतरांचे ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाने कृती करण्याची वृत्ती असते. त्यामुळे वैद्यांनी त्यांना प्रकृतीसंदर्भात समादेश दिल्यास ते त्यांचे आज्ञापालन करत नसल्याचे आढळून येते. यास्तव आजारपण बळावण्याची शक्यता अधिक असते. साधना केल्यास साधकाच्या अंगी गुण बाणवले जात असल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात साधकाला त्यांचा लाभ होत असतो. येथे साधनेचे महत्त्व अधोरेखित होते. – संकलक)