नेहरूंनी सार्वजनिक भाषणात ‘भगतसिंगासारखे धाडस दुर्मिळ आहे’, असा उल्लेख करत गौरव करणे आणि व्हॉईसरायला खडसावणे
जवाहरलाल नेहरू यांनी १२.१०.१९३० या दिवशी एका सार्वजनिक भाषणात ‘न्यायदानातील थोतांड (खोटेपणा) आणि भगतसिंगाचे धाडस अन् बलीदान’ यांसंदर्भात काही शब्द उद्गारले, ‘मी त्यांच्याशी सहमत असो किंवा नसो; परंतु माझ्या मनात भगतसिंगांसारख्या व्यक्तीचे धाडस आणि बलीदान यांप्रती श्रद्धा आहे. भगतसिंगांसारखे धाडस दुर्मिळ आहे. जर व्हॉईसराय आमच्याकडून अपेक्षा करत असतील की, ते हे आश्चर्यकारक धाडस आणि त्यामागील उच्च विचार यांंची प्रशंसा करण्यापासून परावृत्त करू शकतात, तर त्यांचा समज चुकीचा आहे. त्यांनी त्यांच्या मनाला विचारायला हवे, ‘जर भगतसिंग इंग्रज असते आणि त्यांनी इंग्लंडसाठी हे कार्य केले असते, तर त्यांना स्वतःला काय वाटले असते ?’
(संदर्भ : पाक्षिक ‘आर्यनीती’, २५.३.२०११)