१ वर्षानंतर सातार्यातील राजवाडा येथील चौपाटी चालू होणार
सातारा, २२ मार्च (वार्ता.) – कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये बंद करण्यात आलेली राजवाडा येथील चौपाटी २१ मार्च २०२१ पासून म्हणजे १ वर्षानंतर चालू झाली.
या चौपाटीमुळे अनेक कुटुंबांचा चरितार्थ चालत होता. त्यामुळे या कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यावर पालिका प्रशासनाच्या वतीने स्वच्छता, गर्दी आदींचे कारण देत चौपाटी चालू करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. शेवटी चौपाटी येथील उद्योजकांनी भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यांनी काही अटींवर राजवाडा येथे चौपाटी चालू करण्यास अनुमती दिली आहे.