लसीकरणासाठी सातारा जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा सक्षम !
सातारा, २२ मार्च (वार्ता.) – राज्यासह सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे उपाय म्हणून शासनाने लसीकरणाचा दुसरा टप्पा चालू केला आहे. सातारा जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम अत्यंत प्रभावीपणे चालू असून लसीकरणासाठी जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा सक्षम आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक आधुनिक वैद्य संजोग कदम यांनी दिली. त्यांनी शहरातील कस्तुरबा रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक, नगराध्यक्ष, नगसेवक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
आधुनिक वैद्य संजोग कदम म्हणाले, ‘‘आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ६ सहस्र नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लसीचा पर्याप्त साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. लसीचा कोणताही तुटवडा भासू दिला जाणार नाही. जेष्ठ नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींनी तातडीने लसीकरण करून घ्यावे.