भारत, चीन आणि पाकिस्तान आतंकवादविरोधी कारवायांना सामोरे जाण्याच्या पद्धतींचा एकत्रित सराव करणार
यातून भारत आतंकवादाच्या विरोधात कसा लढतो, याची गुपिते पाक आणि चीन जाणून घेणार अन् ‘भारताचा कसा सामना करायचा’ हे पाक तेथील पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना शिकवणार !
बीजिंग (चीन) – आतंकवादविरोधी कारवायांना सामोरे जाण्याच्या पद्धतींचा भारत, पाकिस्तान आणि चीन एकत्रित सराव करणार आहेत. या ३ देशांसह शांघाई सहकार्य परिषद संघटनेतील (एस्.ई.ओ.) सदस्य देशही यात सहभागी होणार आहेत.
The decision to hold the joint exercise “Pabbi-Antiterror-2021” was announced during the 36th meeting of the Council of the Regional Anti-Terrorist Structure (RATS) held in Tashkent, Uzbekistan on March 18.https://t.co/nktSiPjOFb
— Economic Times (@EconomicTimes) March 22, 2021
हा सराव ‘पब्बी-अॅण्टीटेरर-२०२१’ या नावाने होणार आहे. ताश्कंदमध्ये क्षेत्रीय आतंकवादविरोधी परिषदेची ३६ वी बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. आतंकवादी कारवायांना होणार्या आर्थिक साहाय्याचा स्रोत ओळखून त्यावर कारवाई करण्यासाठी सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.