शोपिया येथे ४ आतंकवादी ठार, तर १ सैनिक घायाळ
श्रीनगर – शोपिया जिल्ह्यातील मनिहाल गावामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी लष्कर-ए-मुस्तफाच्या २ आणि लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना ठार केले.
4 terrorists killed, army personnel injured in J-K’s Shopian encounter https://t.co/7nYCxCpI1Y
— Hindustan Times (@HindustanTimes) March 22, 2021
या वेळी एक सैनिक घायाळ झाला. गेल्या ६ मासांपासून आतंकवादी त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. (प्रतिदिन कितीही आतंकवादी ठार केले, तरी पाकमध्ये नवीन आतंकवाद्यांची निर्मिती चालू असल्याने काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट होत नाही. त्यासाठी पाकलाच नष्ट केले पाहिजे ! – संपादक)