पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी पाठवले गेले गुरांचे खाद्य

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून माल जप्त

महानगरपालिका यंत्रणेचा बेफिकीर कारभार !

जनावरांचे खाद्य

पुणे, २२ मार्च – देशव्यापी दळणवळण बंदीमुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद पडल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील राज्य शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या अंतर्गत पुणे येथील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ५८ येथे विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाचा भाग म्हणून जनावरांचे खाद्य देण्यात आले. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ्.एस्.एस्.ए.ए.आय.) च्या अधिकार्‍यांनी या प्रकरणाची नोंद घेत हा माल जप्त केला आहे.

यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, शाळा ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यान्ह भोजन योजनेचा भाग आहे. विद्यार्थ्यांना अन्न वाटप करण्याचे दायित्व पुणे महानगरपालिकेचे आहे. त्यात उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे.