उत्तर कोरियामध्ये घरामध्ये अश्‍लील चित्रपट पहाणार्‍या मुलामुळे संपूर्ण कुटुंबाला तडीपाराची शिक्षा !

भारतात अशा प्रकारच्या कठोर शिक्षा होत नसल्यानेच अश्‍लीलतेचे प्रमाण वाढत आहे, हे लक्षात घ्या !

प्यांगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी देशात पॉर्न पहाणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई चालू केली आहे. एका किशोरवयीन मुलाने अश्‍लील चित्रपट पाहिल्यावरून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला तडीपार करत अन्यत्र पाठवले आहे. हा मुलगा घरात कुणीच नसतांना अश्‍लील चित्रपट पहात होता. देशात अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये ५ ते १५ वर्षांपर्यंत शिक्षा करण्याची तरतूद आहे. तसेच असे चित्रपट आयात करणार्‍यांना जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षा देण्याचीही तरतूद आहे.